आहे कुठेतरी ती आता

Started by Jayjeet, November 01, 2016, 08:44:57 AM

Previous topic - Next topic

Jayjeet

आहे कुठेतरी ती आता,
     काढत असेल माझी आठवण,

    तिच्या शिवाय मनात माझ्या
    नाही कोणतीच साठवण।

रात्री स्वप्नात माझ्या,
    करतो तिच्यासाठी कितीतरी वनवन,

    होणार नाही एक दिवस,
    मला माझे प्रेम सहन।

नाही म्हटल्यावर ती मला,
    झाले होते हृदयाचे दहन,

    तेवढापण नाही वेडा,
    समजु शकतो तिची अडचण।

नाही मिळाली ती मला,
    तर करीन तिच्यासाठी जिव अर्पण,

    पण पुन्हा लक्षाताबांनी हिच दिली का शिकवण।

असेल कुठेतरी ती आता,
    काढत असेल माझी आठवण।

                             - JयGत