दिवसभर पाहीली वाट तुझी

Started by Jayjeet, November 01, 2016, 08:47:35 AM

Previous topic - Next topic

Jayjeet

दिवसभर पाहीली वाट तुझी,
तू आली नाहीस आणि तुझी आठवण गेली नाही।
दिवसभर पाहीली वाट तुझ्या फोन ची
तुझी फोन तर आलाच नाही, कधी येणारही नाही।

आपल्या प्रेमाचही असंच होईल ना प्रिये?,
आयुष्यभर पाहीन वाट मी तुझी
पण तू कधी येणारच नाहीस।
आयुष्यभर करीन प्रेम मी तुझ्यावर
पण तुला कधी ते कळणारच नाही।

का करतो एवढं प्रेम मी तुझ्यावर,
मलाच सजजलं नाही तर तू कधी समजून घेणार?
माझ्या आयुष्याची किंमत मलाच कळाली नाही तर तुला कधी समजणार???
-----Jayjeet