का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे

Started by सनिल पांगे....sanilpange, November 01, 2016, 02:04:17 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं आहे
कुंपणा बाहेर जग चिखलानं बरबटलं आहे

का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे
कालचं माझं एकीशी नातं जुळलं आहे

का निरुत्तर पत्र धाडतो मी तीला
तीने केव्हांच घर बदललं आहे

का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे
नाजूक फुलांना कालचं कुणी खुडलं आहे

मोठ्यानं बोलू नकोस साऱ्यांनी बजावलं
बजावताना जग मोठ्यानं किंचाळलं आहे

@सनिल पांगे