मन बोलतय

Started by Balaji lakhane, November 02, 2016, 07:36:11 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

----------------मन बोलतोय--------------

आता लावणार नाही मी जीव कोणावर,
राहणार तिच्यापासुन मी दहा कोसावर.!

हसऱ्या चेहऱ्याकडे कधी पाहणार नाही,
कधी प्राण जाईल काही कळणार नाही.!

जीवन आजून खूप मला जगायचे आहे,
प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा आहे.!

प्रेम करण्या पुर्वीचे दिवस आठवायचा आहे,
तिच्या आठवणीत रडणे सोडयचे आहे.!

तिने माझ्या मनावर वारही खूप केले,
एका सेकंदात पुर्ण आयुष्य रंगहिन केले.!

प्रेम हे अमर आहे कधी संपणार नाही,
ह्रदयात ठेवणार तिला सांगणार हि नाही.!

आता लावणार नाही मी जीव कोणावर,
राहणार तिच्यापासुन मी दहा कोसावर.!

-----------बालाजी लखने(गुरू)-----------
             उदगीर जिल्हा लातुर
             भ्र.८८८५२७३०४