कविता II मी फक्त विचार करतो II

Started by siddheshwar vilas patankar, November 02, 2016, 05:28:54 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


मी फक्त विचार करतो

मी अस्सं करेन नी मी तस्सं करेन

मी देईन दान एक अष्टमांश

माझ्या कमाईतून गरिबांना

मी घेईन नाव त्या अनंताचे

दिनचर्या करताना

जेव्हा पगार होतो , तेव्हा

सुस्तावलेला अजगर पुन्हा जागा होतो

विळखा घालतो

हरेक नोट पिरगळलीं जाते

प्रत्येक गरजेनुसार

अस्सं करता करता

एकेका विळख्यामागे संपतो पगार

अजगर परत सुस्तावतो

मी धास्तावतो, नी परत तोच विचार

मी अस्सं करेन नी मी तस्स करेन

सरत्या महिनाअखेरी हरेक दिवशी मठाची पायरी

बिन तिकीटाची वारी

मला आपली वाटू लागते

मठात जाताना वाटेवर चित्रपटांची जाहिरातबाजी

नकोशी वाटू लागते

खिसालक्ष्मी आटलेली असते

खाली टरकून फाटलेली असते

इथे प्रत्येक मौजेस पैसे लागतात

तेव्हाच  समजते मला

तुला "अनंत" का म्हणतात ?


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C