कविता II अस्सा कस्सा रे तू सावकार ? II

Started by siddheshwar vilas patankar, November 02, 2016, 06:11:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

अस्सा कस्सा रे तू सावकार ?

अश्शी कश्शी रे सावकारी ?

आम्ही जन्माचे भिकारी

तरी वाटे ऊन तू सोनेरी II

ना व्याज तू आकारे

ना मुद्दल तू मिळवे

मनू मातला मातला

बुडला संसारे संसारे II

तो चांद बघ घेतो

एक सुट्टी ती मासात

शीतल चांदणं विकतो

गपचूप अंधारात

तू तळपत राहतो

हर दिन त्या मासात

तुला नाय ठावं वार

अस्सा कस्सा रं तू सावकार II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C