भेट

Started by शिवाजी सांगळे, November 02, 2016, 09:16:22 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भेट

दिवाळीचा सण आला,
आणि निघुन सुद्धा गेला...!
रहावं आठवणीत म्हणुन
काही भेट वस्तु देऊन गेला...!
काही पसंतीच्या, बऱ्याच  नापसंतीच्या
ज्या अश्याच वाटल्या जातात, गुपचूप
एका हातातून दुसऱ्या ...!
उधडून जेंव्हा,
उघडली जातात खोकी,
रडवेले होतात चेहरे...
त्या रंगीत, चमकत्या कागदांचे
आणि फटाक्यांच्या आगीने
होरपळून निपचित पडलेले...
धिक्कार करीत असतील
कित्तेक जण स्वत:चा... कचरा कुंडीत...!
कचरा गोळा करणाऱ्यांचा
स्पर्श होता कदाचित... त्यांना
मिळत असावी काहीशी शांतता?
तसं तर, आपणही मोजतोच कि!
वस्तुच्या कव्हर वरून, दुसऱ्यांना...
असतं जे बऱ्याचदा फसवं,
तरी विसरतो आपण,
स्मित हास्याला... त्या
ज्याला... अनमोल भेट
मानलं जातं !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९