कविता II जन्मोजन्मीचं नातं II

Started by siddheshwar vilas patankar, November 03, 2016, 01:36:13 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


जन्मोजन्मीचं नातं

भावनांचं जातं

कवितांचं पोतं

नवीन शब्दासंगे

अस्संच दळत राहतं II

काही पेरतात संकरित

काही उगवतात देशीवंत 

काही असतात जातिवंत

पण  शोभतात मूर्तिमंत 

कविता आपुल्या II

कुठे अंत नाहि

कुठे पाप नाही

साहित्याची शाई

पेरे निर्गुण भाव  अन सगुणाची पायरी

कविता आपुली  II

दिसे देश माझा

दिसे भावना त्या

माळा शब्दांच्या ल्यायलेल्या   

भावना कोळून प्यायलेल्या 

कविता आपुल्या II

गाडे चालू ते अखंड

नको पडू दे कधी खंड

लाभो आयुष्य उदंड

कवितांसी आपुल्या II



सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C