* मॅडम *

Started by Ratnadeepmuneshwar, November 03, 2016, 01:42:45 PM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

मॅडम , तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
मॅडम ,
तुमचंही एक घर असेल
नवरा असेल , सासू असेल ,
सासरा असेल , दीर असेल
घरात सारखी पीरपीर असेल
जाऊ बाई जोरात असतील
नणंद बाई तोऱ्यात असतील
तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील
तुमच्या बागेत फुलं असतील
सर्वांसाठी तुम्ही
अहोरात्र झिजता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
तुमच्याही घरात
भांड्याला भांडे लागत असणारच
कुणी आपुलकीने
तर कुणी द्वेषाने वागणारच
कुणी रुसणार , कुणी फुगणार
कुणी रागवणार , कुणी जागवणार
कुणी भरवणार , कुणी जीरवणार
मन मारून तुम्ही
सगळ्यांचच मन राखता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
सासऱ्याची एकादशी
सासूचा प्रदोष
नवरा म्हणतो मटण कर
त्याचा काय दोष
दीर म्हणतो गरम वाढा
नणंद म्हणते उष्टी काढा
आजेसासूची गोळीची वेळ
मुलं म्हणती आमच्याशी खेळ
नवऱ्याचाही असतो थाट
नखरे त्याचे सतराशे साठ
आल्या गेल्याचही तुम्ही
किती बेवार बघता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही किती छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
तुम्हालाही मन आहे
कोण जाणतं ?
तुम्हालाही भावना आहे
कोण जाणतं ?
तुम्हीही माणूस आहात
कोण मानतं ?
त्यांना तुमचं काम हवं
कमावून आणलेलं दाम हवं
तुमची माया हवी
तुमची अख्खी काया हवी
विनातक्रार तुम्ही सारं
कसं काय सोसता ?
पण जाऊद्या , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता