"तु आणि आयुष्य"

Started by ηأκнأl η. βοlε, November 04, 2016, 12:47:37 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

सहवासात सखे,
भान माझे हरवले...
अस्तित्व ही माझे आता,
माझ्यात न राहीले.

प्रेम इतके सखे,
जसा जीव ओवाळावा तुझ्यावर
आपुलकी इतकी सखे,
तु मिटूनी जावी माझ्यावर.

वेगळेच अनोखे विश्व,
आपुल्या प्रेमातुन उभे राहीले...
त्याच विश्वाला सखे माझे,
जीवन मी वाहिले.

प्रेमळ आपुल्या जीवनाला,
आनंदाची बहार यावी...
पहिल्या सरीत सखे जशी,
तु चिंब चिंब भीजुन जावी.

असेच निस्वार्थ प्रेम प्रिये,
सदा आपुले अमर राहील...
चांदन्यांसोबत जोपर्यंत,
शुभ्र असा चंद्र राहील...

ηأκнأl η. βοlε
8550951989