कविता II वीट आलाय जगायचा , तू राहा विटेवर कायम उभा II

Started by siddheshwar vilas patankar, November 04, 2016, 01:29:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

सकाळ सकाळ वृत्तपत्रात

मांडलेली बघून अत्याचाराची सभा

वीट आलाय जगायचा

तू राहा विटेवर कायम उभा II

कोण अब्रू लूटतंय

कोण घर पेटवतंय

कुठे खून तर कुठे दरोडे

यत्र तत्र सर्वत्र केवळ

विष वाहतंय II

मूठभर दाण्यापाण्यासाठी

चोरतंय कुणी गटाराचे झाकण

त्याच गटारात दुसऱ्याचं मूल पडतंय

बघताना वाकून II

किती किती तो आक्रोश

किती किती तो आकांत

काय चाले पंचक्रोशीत

तरी कसा तू निवांत ?II

सालं शिक्षण बाटलं

जागोजागी ते विकलं

तिथून सुरु सारं झालं 

अत्याचाराचं दाखलं II

बाप खर्च करी मॉप

करी पोराला डॉक्टर

पोर ढुंढाळी साऱ्या वाटा

जमवे संपत्ती अमाप II

लावे पैशाचा हिशेब

जरा होता मोठं पोरं

खरा बाप तोचि चोर

कालवे मना भ्रश्टाचार II

उरले नाही ते संस्कार

नाही पाहिला आचार

करी निव्वळ विचार

कसा मिळेल लठ्ठ पगार II

हीच शिडी होय जाणा

जिथे बिघडतो बाणा

पाजा बाळकडू त्यांसी

पोराच्या बालपणा II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C