कविता II मनाएवढा ग्वाही त्रिभुवनात पाहिला नाही II

Started by siddheshwar vilas patankar, November 04, 2016, 03:36:27 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

मनाएवढा ग्वाही त्रिभुवनात पाहिला नाही

योग्य, अयोग्य, नीतिबाह्य, बरे, वाईट

ज्याचे त्याचे मन देई ज्याला त्याला ग्वाही

बाह्यमन असो कसेही तरी सारे अंतर्मन पाही

कुणाचे मन जागोजागी पळे

कुणाचे क्षणात दुःखाचे तळे

मन नउ मण जळे

मनी कुणी गाठ ठेवता

या मनाची थोरवी

सांगू शके न विधाता

सुखादिकांचे ज्ञानार्जन

मन एकची साधन

असावे सधन,सद्विचारांनी


सिद्धेश्वर विलास पाटणकर C   
सिद्धेश्वर विलास पाटणकर C