चाळ

Started by Dnyaneshwar Musale, November 05, 2016, 10:55:38 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आमची चाळ कधी जन्मली
हे काय ठाऊक नाही,
इथं दारं वाजतात साखर झोपेत
असते त्यांना पाणी भरण्याची घाई.

सकाळी इथं धुणं धुवायला
सुरुवात होते,
कुणाची ना कुणाची धुणी
धुत संध्याकाळ निघुन जाते.

सवतींचं भांडण नसेल
असं इथ असतं,
चिघळवणारेच म्हणत असतात
आम्ही आहे व्यस्त.

कुजबुजलेल्या खाना
खुणांना इथं असतो भाव,
एका बाटलीत इथं
अतिशहाना होतो राव.

माणुसकीच्या घराला
चाळीत कधी दार नसतं,
कोणाचं कोण तरीही
माणुस पण जपलेलं असतं.

चाळीत अजुनही दोन चार
पोरं पोरी जागत असतात,
सर्वांन पेक्षा थोडं जास्तच
प्रेमाने एकमेकांशी
वागत असतात.

ही चाळ कधी कोणाची
बनते पाठवण,
तर कधी माहेरची
एक आठवण.

चाळीत अजुनही
बरंच काही असतं,
पण चाळीत राहिल्याशिवाय
ते कळत नसतं.