कविता II त्या निखळ पहाडी सौंदर्यास भुललो II

Started by siddheshwar vilas patankar, November 05, 2016, 11:07:19 AM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

त्या निखळ पहाडी सौंदर्यास भुललो

अन आत डबक्यामध्ये एक शुभ्र अंदुकाश्म

बुक्कन वर आला

अंधारलेले असेच होते

तिला बघून एक मिणमिणता दिवा तयार झाला

थोडा का होईना पण आत प्रकाश झाला

कोरीव चेहऱ्यावर रेखीव डोळे तिचे

शुभ्र वर्ण सारा , नाक धारेचे

वर्णिता ते रूप सारे

खुलून गेले मन माझे

अंदुकाष्माचा कलायाश्म झाला

दिवा जाउनी सूर्य आला

जायचे होते भलतीकडेच

पण तिच्या घरापर्यंत प्रवास झाला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C