दोन किनारे !!!

Started by Ashok_rokade24, November 06, 2016, 11:54:27 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

दोन किनाऱ्यांपरि मी आणिक तू ,
दूरच्या क्षीतिजापरि मी आणिक तू ,                 

शितल किनारा तुझा निसर्ग बहरला ,
वनव्यात किनारा माझा खाक झाला ,
दोन किनारे समांतर एक न कधी झाले ,
अथांग नभ नीत धरणीस वंचीत राहले,
फुल काटेरी असे मी निवडूंगाचे ,
जलाशयातील सुंदर कमल पुष्प तू ,

दोन किनाऱ्यापरि मी आणिक तू ,
दूरच्या क्षीतिजापरि मी आणिक तू , 

निवांत तू कुशीत रजनीच्या ,
स्वार तू हिंदोळी स्वप्नांच्या ,
आठव तुझा मनी नित दाटे ,
रात्र सारी मज भयाण वाटे ,
काळोखी मज मी हरवून गेलो ,
चांदण्यात पौर्णिमेच्या ऊभी तू ,

दोन किनाऱ्यापरि मी आणिक तू ,
दूरच्या क्षीतिजापरि मी आणिक तू ,

कटाक्ष तुझा मन ओढ घेई ,
स्मिताने तुझ्या मन मोहून जाई ,
वाटे नित तुजसवे मी असावे ,
तुजपाशी मन माझे रीते करावे ,
परि बंधनी गुंतलो मी आणिक तू ,
संग्रामी रूढींच्या हरलो मी आणिक तू ,

दोन किनाऱ्यापरि मी आणिक तू ,
दूरच्या क्षीतिजापरि मी आणिक तू ,

                             अशोक मु. रोकडे.
                              मुंबई.