मुखवटे........!

Started by Ashok_rokade24, November 06, 2016, 11:59:50 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

ऊजेड प्रखर अवती भवती ,
तरीही जिवाला भय वाटे ,
स्वापदे भयंकर सभोवती ,
लेवून माणसांचे मुखवटे ,

जात जातीस धरी वेठीला ,
कुणी कुणाचा घात करी ,
धर्माची पसरली वारूळे ,
कुणी डंख विखारी मारी ,
रान सारे स्वापदांनी भरले ,
साथीला पेरले विषारी काटे ,

स्वापदे भयंकर सभोवती ,
लेवून माणसांचे मुखवटे ,

जलाशयातील मासोळी सुंदर ,
क्रीडामग्न असे  लाटेवरी ,
फेकून बुरखा साधूत्वाचा ,
क्षणात बगळा घास करी ,
धडपड सुटकेची केविलवाणी ,
आनंद आसूरी बकास वाटे ,

स्वापदे भयंकर सभोवती ,
लेवून माणसांचे मुखवटे ,

वनव्यात वनाच्या संस्कार जळाले ,
ओळखीचे मुखवटे अनोळखी झाले ,
गिधाडांनी ही लचके तोडीले ,
माळरानी झाडावर प्रेत लटकले ,
निष्पाप अश्रू डोळ्यातच सुकले ,
शालू हिरवा मग भकास वाटे ,

स्वापदे भयंकर सभोवती ,
लेवून माणसांचे मुखवटे ,
                      अशोक मु. रोकडे.
                       मुंबई.