मी प्रेममयी ,तु साजणी

Started by ronitsg1417, November 06, 2016, 12:33:35 PM

Previous topic - Next topic

ronitsg1417

मी प्रेममयी,तु साजणी
मी चंद्र,नि तु चांदणी

तुझेच स्वप्ना पाहता
रानी तु पर्यातली

वेड मजला लावुनि
सोडु नको अधांतरी
तुझेच चित्र रेखाटतो
प्रेमात रंगून जा तरी

जशी प्रिये तु स्वप्नातली

प्रीत आस लावुनि
मनि चातक उरातली
गुलाबाचे रूप तुझे नि
गंध हा फुलापरी

मी प्रेममयी,तू साजणी

रूप तुझे न्याहाळतो
मधुचिंब आेठांवरी
लाजताना हासते
खळी ती खट्याळशी

नयनांची मोहिनी तु
वाटते मंथनातली
गंधाळून जातो आसमंत सारा
जशी कस्तुरी तु मृगातली

मी प्रेममयी,तू साजणी

मी प्रेम,तु गीत ग
रागिनी तू स्वरांतली
या भुलल्या मनाची
वेडी तु संवादिनी

मी प्रेममयी,तु साजणी



कवी:-राेणित गायकवाड
Mob no .9922922308