कवितेची जन्मकहाणी

Started by Asu@16, November 06, 2016, 06:50:53 PM

Previous topic - Next topic

Asu@16

कवितेची जन्मकहाणी

कवितेचे बीज
क्षणी चमकती वीज !
आले कुठून कसे ?
नसे पावलांचे ठसे.

जैसा पावसाचा थेंब
पडे शिंपल्या स्वातीत
तैसा अंकुरण्या कोंब
पडे मनाच्या मातीत

शब्दाशब्दांचे शिंपण
ऊनपावसाचा खेळ
करी वैचारिक वादळ
असा खट्याळ हा मेळ.

बीज रुजता उदरी
घंटा वाजती मंदिरी
पावा घुमता मनात
ध्यान लागते अंतरी

कधी प्रसूती क्षणी
कधी महिन्यांचा काळ
अशी जन्माची कहाणी
सांगे कवितेचे बाळ.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita