कसं विसरु मी

Started by Ashish dhikale, November 06, 2016, 09:00:43 PM

Previous topic - Next topic

Ashish dhikale

कसं विसरु मी
माझ्या मनातल्या तुला,
कसं विसरु मी
तुझ्या आठवणींना..
कसं विसरु मी
त्या अनमोल क्षणांना,
कसं विसरु मी
तुझ्या खट्याळ हसण्याला..
कसं विसरु मी
तुझ्या गोड लाजण्याला,
कसं विसरु मी
तुझ्या अल्लड वेडेपणाला..
कसं विसरु मी
तु मुरडलेल्या नकट्या नाकाला,
कसं विसरु मी
तुझ्या गहिवार डोळ्यांना..
कसं विसरु मी
तु कुरवाळलेल्या जखमांना,
कसं विसरु मी
तु मोडलेल्या मनाला..
कसं विसरु मी
तु तोडलेल्या ह्रदयाला,
अजुनही सगळीकडे तुचं दिसतेसं,
तुझाचं भास होतो..
एकदाचं सांग ना गं..
कसं विसरु मी तुला.... Ashish Dhikale