भावना

Started by Sanket Potadar, November 06, 2016, 10:18:44 PM

Previous topic - Next topic

Sanket Potadar

भावना

खूप काही सांगणं असं
     मनातचं राहिलं
मन तुझचं ओळखत होतो
माझं संगायचच राहिलं

वाटलं ओळ्खशील तू
जे मला सांगायचं होत
माझ्या मनातील प्रेम भावना
तुझ्या मनात आणायचं होत

कमी पडलो मीच कुठेतरी
कि तुलाच समजून घ्यायचं न्हवतं
शब्दच न्हवते स्वतःला सांगताना
कि सांगताना शब्द संपवायचं न्हवतं

आखत बसलो तुला कवितेत माझ्या
अल्पात तुला माझ्या कवितेनेच मांडले
वेळ अली मला तुझ्यात मांडायची
तेव्हाच शब्द का कमी पडले

सूर्य एकटाच बिनकामचा
नवीन दिवस नव्याने आला
विसरून दुःख न मिळाल्याचे
नवीन संधी देऊन गेला

आजतरी तू होशील का माझी
कि त्याच चंद्राने रात्र दिसेल
का कधीच तो दिवस नसेल
ज्यात माझे हृदय तुझ्यात असेल

            संकेत पोतदार