आई

Started by vijaya kelkar, November 08, 2016, 04:13:11 PM

Previous topic - Next topic

vijaya kelkar

  आई
आसपास ही चिवचिव कशी?
इवली इवली पिले उपाशी

आ वासून ती चिमुकली
इवल्याशा चिमणचाऱ्याने चोच  भरली

आमुची कपिला चाटते पिलास
इकडे कासंडी अपुरी पडे दुधास

आली जाग आली पाळण्यास
इतक्यात आले रडू गालीच्या खळीस

आरण्याच्या राणीच्या पहा हावभावा
ईरमोड न होता अंगावर खेळी छावा

आधार माया ,माया प्रबळ
ईप्सित आईचे सुखी राहो बाळ
          विजया केळकर _____