करु तुझ्यावर प्रेम मी...

Started by Jayjeet, November 08, 2016, 09:25:08 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

 करु तुझ्यावर प्रेम मी
की विसरुन जाऊ तुला
अडकला आहे जीव तुझ्यात
विसरणे आता कठीण वाटे मला।

होऊन गेलो जरी मी वेडा
सतत लिहीत राहीन मी तुला
लिहीता लिहीता एक दिवस
समजावशील का आपल नातं तू मला

किती होतोय दाह या हृदयाचा
कोण जाणे कधी कळेल तुला
एकदा येऊन बघ हृदयात माझ्या
तुझी किती गरज आहे याला

कधी काळी का वेड लागे या मनाला
माझ्याच अंगणी पहावे वाटे मज तुला
जन्मो-जन्मी जपेन मी आपली नाती
प्रिये, फक्त एकदा "हो" म्हण ना।
                                    --Jayjeet