तूच सांग मला आता कोणाशी मी भांडू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 11, 2016, 03:37:53 PM

Previous topic - Next topic
प्रेम करताना बोललीस नको विचार करू आता
तूच सांग कसे आयुष्य काढू तुझ्याविना आता
तूच सांग कोणाला माझी व्यथा सांगू
निर्दयी ह्रदयाची हाल, कुठे मन मोकळे करून टाकू
आता तूच सांग कोणाशी मी भांडू
तूच म्हणालीस ना, मला अर्ध्यावर नको सोडू
तूच गेली मला सोडून अशी, किती मी कूढू
आता माझे दुःख मी सांग कोणापाशी मांडू
तूला देण्यास आणलेले फूल, आता कोणास देऊ
तेही हिरमुसून गेले तू आता माझी नाही पाहून
प्रेम होते तेव्हा खूप माझ्यावर रागवायचीस
वेळेवर नाही आलो तर माझ्यावर रूसायचीस
तूच सांग मला कोणाचा रुसवा मी काढू
तूच सांग मला आता कोणाशी मी भांडू
भांडण तर कधी चुकून केले नाही तुझ्याशी
का आता तुझ्या चेह-यावरचा राग माझ्याशी
देवाकडे पुन्हा एकदा तूला कसा मागू
देव पण बोलेल तूला कसा मी देऊ
आता तूच सांग मी कोणाशी भांडू
हृदयातील वेदनेच गाण कोणापाशी मांडू

.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)
अहमदनगर. मो. 9637040900