बुडाखालचा अंधार...!

Started by Rajesh khakre, November 11, 2016, 06:21:47 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

बुडाखाली किती अंधार
हे हळूहळू कळते आहे
नोटा बंद झाल्यामुळे
अनेकांची जळते आहे

जनतेला त्रास होतोय
जो तो बोलतो आहे
पोट स्वतःचे दुखतेय
ते मात्र लपवतो आहे

जनता सारी खुश आहे
तुम्ही टेन्शन घेऊ नका
उगीच जनतेच्या नावाने
रडगाणे गाऊ नका

झालाच काही त्रास तर
जनता सहन करील
तुमचा काळा पैसा तरी
निदान नष्ट होईल

जनतेकडे नाही हो
जास्त काही पैसा
वाट लावायला तुमची
खाईल थोडी खस्ता

ज्यांच्या ज्यांच्या पैशांचा
हिशोब नाही लागणार
मोदींच्या या निर्णयाला
तोच विरोध करणार
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Sagar Laholkar