मैत्र जीवाचे

Started by Parshuram Sondge, November 12, 2016, 01:57:15 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge


मैत्र रूजवीत आलो ...

राखेतच स्वप्नांच्या  मी
फुलेच वेचित जरा आलो

उसवले आयुष्य हे माझे
जिद्दीने जरा तुणीत आलो

गंधलो होतो मी किती तरी
उधळूनी प्राण सुरात रडलो

गिळूनी सा-या वाटा त्यांनी
पाठीत खंजीर कमी  नव्हते

रक्तात माझ्याच सांडणा-या
जीवाचे मैत्र रूजवीत आलो

छाटले जरी पंख भ्याडांनी
अभाळ हे कवेत घेत आलो
               ****
. . . परशुराम सोंडगे ,पाटोदा
. . . . . 9673400928
Pprshu1312