महाराष्ट्र माझा

Started by Asu@16, November 13, 2016, 07:52:56 PM

Previous topic - Next topic

Asu@16

महाराष्ट्र माझा

माणूस मी
माणसाची भाषा बोलतो
माणुसकी धर्म माझा
मानवाला देव मानतो
वारकरी पंथ माझा
नामा तुक्याचे अभंग गातो
मराठी मी
महाराष्ट्राची शान जाणतो
शिवराय भिमराय माझ्या रक्तात
कर्वे फुले अन् श्वासात
गांधीजींचे गुरू गोखले
त्यांना ना कुणी ओळखले
डोक्यात माझ्या टिळक आगरकर
हृदयात अन् रानडे सावरकर
ज्ञानेश्वरी माझी मायमाऊली
सानेगुरूजी प्रेमसावली
असा श्रीमंत वारसा ज्याचा
कुठे गेला तो महाराष्ट्र माझा

- अरूण सु पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

M Sarvadnya

mast
khup chan

jai Maharashtra
ch.shivaji maharaj ki jay
M Sarvadnya