तु

Started by Dnyaneshwar Musale, November 13, 2016, 08:42:08 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तु किती सुंदर, लाजरी
गोजिरी वैगेरे,,,आहे
हे मला माहित नाही
तु किती माझ्यावर
प्रेम करते हे ही
मला ठाऊक नाही
आणि ते विचारण्याचा मी 
प्रयत्नही करणार नाही
तुझ्या आवडी निवडी
जाणुन घेण्याची माझी
मुळीच इच्छाही नाही,
माझ्या साठी तु हसावं, रुसावं
नटावं, तु पार वेडं व्हावं ही
माझी अपेक्षा नाही,
माझ्या सवयी प्रमाणे तु
स्वतःला बदलुन टाकावं,
आणि तुझी स्वप्न तु
झाकलेल्या डोळ्यांतच
ठेवावं, अनं माझ्या स्वप्नांच्या
पाया मुळापर्यंत जाऊन त्यांना भर
घालावी असही काही नको
आहे तशीच ठीक आहे
पण तु माझी नाही
हीच तर माझी बाजु विक आहे.


siddhesh kale

khup mast "''^|"'''@! avadli                     

Dnyaneshwar Musale

धन्यवाद

Buntyda


Dnyaneshwar Musale

धन्यवाद