कविता माझी ......

Started by विजय वाठोरे सरसमकर, November 14, 2016, 03:21:41 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

कविता माझी ......


कविता माझी
मी देऊन ऱ्हायलो वर्तमानपत्राले
मग काय सांगू तुमाले
मले भल्याभल्यांचे फोन येऊन ऱ्हायले

म्हणे काय तर
तुम्ही कवी कायले बनले ?
अन त्यात तुम्ही काय
तुमचेच गऱ्हाणे मांडून ऱ्हायले ?

खरं सांगा कवी महाशय
कवितेपाई तुम्ही पोट्टी पटू ऱ्हायले ना
तुम्ही लिहिलेली कविता वाचून
आम्ही सैराट होऊन ऱ्हायले ना

एके दिवशी माझा
प्रेमकथेचा लेख प्रसिद्ध झाला
मग काय सांगू तुमाले
मले पोट्टीचेच फोन येऊन ऱ्हायले

म्हणे एक पोट्टी मले
तुमची प्रेयसी सोडून गेली म्हणे तुमाले
मग माझ्यासाठी आहे का जागा रिकामी
माझा दिल देईल मी तुमाले

                            साहिल
                 विजय वाठोरे सरसमकर
                 हिमायतनगर जि.नांदेड
                   9975593359