दुरावा

Started by ashrita vijay barse, November 14, 2016, 08:34:43 PM

Previous topic - Next topic

ashrita vijay barse

नाही नशिबात तु माझ्या...
नाही नशिबात प्रेम माझ्या...

संपलं सर्व आलं डोळ्यात पाणी हळूचं...
पाणी थांबत नाही कारण तु हवीचं...

हवी आहेस तुच मजला...
पण अर्ध्यात सोडले तु मला...

डोळ्यातील अश्रु वाहत आहेत तुझ्यासाठी...
वळुन तरी बघ, केवळ एकदा माझ्यासाठी...

नाही विसरु मी शकत तुला...
पण तु विसरु शकतेस का मला...?

कसे विसरु तुझे ते लुकलुकणारे डोळे...?
लुकलुकणाऱ्या डोळ्यात सर्व होते जग निराळे...

कस विसरु तुझे ते गालातल्या गालात येणार गोड हसणं...
कसं विसरु पुर्ण दिवस तुझ्यातचं रमणं...

दिवस गेल्यावर राहतील आठवणी...
आठवणी आठवतं राहल्यावर डोळ्यात येईल फक्त पाणी...

पाण्याचा साठा साचत राहील फक्त त्या डोळ्यात...
अश्रुंची किंमत नाही मोजु शकत मी या प्रेमात...

विश्वास आहे मला कि एक न एक दिवस परत येशील...
पण त्या दिवशी वेळ निघुन गेलेला असेल...

वेळ जाईल, वाढतील दिवस, बदलेल काळ, राहतील स्वप्नांचे पिंजरे...
स्वप्नांच्या पिंजऱ्यात जीव अडकुन काजव्यांसारखे भिरभिरे...

भिरभिरणारे काजवे उडत आहेत फडफडणाऱ्या पंखासारखे...
जखमी झालेले पंख त्रास देतात प्रेमाच्या आठवणीसारखे...

प्रेम संपले, जीव संपला, इच्छा संपली, आठवणी संपल्या, येतील फक्त जोरजोरात जुन्या आठवणींचा सुसाट वारा...
जीवापाड केलेलं प्रेम एका मिनिट मध्ये संपुन राहिला फक्त आणि फक्त दुरावा...

कु. अश्रिता विजय बारसे