कविता म्हणजे खरचं

Started by k.suhas, November 15, 2016, 01:00:51 PM

Previous topic - Next topic

k.suhas

कधी ती हसवते
कधी ती रडवते
कविता म्हणजे खरचं
मनातले तरंग लेखणीतून रेखाटते

कधी ती रूप रंगवते
कधी ती शृंगार दर्शविते
कविता म्हणजे खरचं
साहित्याला शोभणारा अलंकार घडवते

कधी असते ती निसर्गाचे तन
कधी असते ती या समाजाचे मन
कविता म्हणजे खरचं असते
प्रेमाचा एक अनमोल क्षण

कविता असते साहित्यातील मोती
सगळच सामावणारी काळी माती
कविता म्हणजे खरचं
शब्दानी शब्दांसोबत जुळलेल्या नाती

कविता म्हणजे रिमझिम पावसाचे पाणी
लुकलुकणारी एक आकाशातील चांदणी
कविता म्हणजे खरचं
तुझी माझी एक प्रेम कहाणी...

सुहास काकडे
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com