चितेवरतीही जिवंत होतो

Started by abhishek panchal, November 15, 2016, 06:24:27 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

जीवाला तडफडताना बघत , हात बांधून उभा होतो .
जिवाच्या त्या मयतीची , एकुलता मी सभा घेतो
कोणी मन लावून रडत होतं , कोणी ताटकळत रेंगाळत होतं .
शोक बाजूलाच , कोणी कवटीच्या रोषात होतं

कानाडोळा करत साऱ्याकडे , उघड्या डोळ्याने सारं बघत होतो .
अस्तित्व हरवलेला मी , चितेवरतीही जिवंत होतो .

जमवलेली माणसे , त्या गर्दीत शोधत होतो
गर्दी अशी पाहून , उगा दुःख भोगत होतो
नड होती खरी , तेव्हा कुठे होते सारे ?
मयतीच्या या सभेला , गर्दी अशी करणारे

पर्वा नव्हती कुणा , मी कसली झळ सोसत होतो
अस्तित्व हरवलेला मी , चितेवरतीही जिवंत होतो .

होतं नव्हतं सारंकाही , दसरा समजून लुटून नेले
कुटून कुटून दुःखाने मग , नभागत मन दाटून आले
सगे सोयरे धरतीवरचे , अलविद्याला एक झाले
गुंफता यांना माळेमधे , बघून डोळे भरून आले

यांना असं बघून , मी डोळे माझे पुसत होतो
अस्तित्व हरवलेला मी , चितेवरतीही जिवंत होतो .

                                         - अभिषेक पांचाळ
                                         ( ९०२८८७५९५८ )