बालपण

Started by k.suhas, November 16, 2016, 10:28:27 AM

Previous topic - Next topic

k.suhas

बालपणीचे दिवस किती मस्त जगत होतो
मनसोक्त हसत होतो खिदळत होतो
वडीलांच्या खांद्यावरुन जग बघत होतो
आईच्या कुशीत शांत झोपत होतो
आजोबाना घोडा बनवून घर फिरत होतो
आजीच्या गोष्टीमधे रमत होतो
बालपणीचे दिवस किती मस्त जगत होतो

ना कसला गर्व ना कसला माज होता
पावसाच्या पाण्यावर पोहणारा आमचा पण जहाज होता
कधी फळे खाण्यासाठी झाडावर चढत होतो
कधी फुलपाखरू पकडत बागेत धावत होतो
रात्री सगळे गच्चीवर मिळुन चादण्याचे चित्र काढत होतो
बालपणीचे दिवस किती मस्त जगत होतो

ना कंप्यूटर होता ना मोबाईल होता
टेंशन नव्हते इंटरनेटचे ना बॅटरीसाठी चार्जर होता
चेंडू पतंग पाटी लेखनात आमचा वेळ जात असे
सायंकाळी बाबासोबत चौकात भेळ खात आसे
सायकल घेउन मित्रांसोबत सगळा गाव फिरत होतो
बालपणीचे दिवस किती मस्त जगत होतो

ना फेसबुकची पोस्ट ना व्हट्सपचा हाव होता
जेवणानंतर रंगणारा आमचा बिटफुलचा डाव होता
ना नौकरीची चिंता ना भविष्याचा होता विचार
बिनधास्त खेळायचो सगळे दिवस होते रविवार
आईच्या हातचे गरमागरम जेवण जेवत होतो
बालपणीचे दिवस किती मस्त जगत होतो

बालपणीच्या दिवसांचा सगळ्याना वाटतो हेवा
तुकोबा पण म्हणायचे लहानपण देगा देवा
बालपणीचे दिवस किती सुंदर किती निरागस
मोठे होऊन बघतो रस्त्यावर निखारे अन राखच
ऊनपाऊसा सारखा आता कधी हसत कधी रडत आहे
बालपणीचे दिवस आता आठवू आठवु जगत आहे
बालपणीचे दिवस आता आठवू आठवु जगत आहे
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com