प्रेम चारोळ्या।

Started by Jayjeet, November 16, 2016, 02:48:37 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

***चारोळ्या***

1)...
का हूर ही मनाला वाटे?
तुझ्याच आठवणी हृदयात दाटे
तुझ्याशिवाय जगणे असे वाटे,
जसे निसर्गाचा प्रकोप माझ्यावरी लोटे।

2)...
का आस ही लागे मनी ?
का ध्यास लागे तुझाच क्षणोक्षणी?
होतसे भास मज तुज वाचूनी
जसा मी तुझा चंद्र आणि तू माझी चांदणी।

3)...
ओसंडूणी वाहे हृदयातूनी प्रेम तुझे
मनात वसलेले तुझेच रूप साजे
स्वप्नात येता तू का प्रेमाचा गजर वाजे?
अशी हसून मनात तू नवरीपरी लाजे।

4)...
का विश्वास नसे तुज माझ्या प्रेमाचा?
का वाटे तुला प्रेम माझे खोटे?
असा का खेळ करतेस प्रेमळ क्षणाचा?
नाही मिळणार जसा मी गाणारा तुझेच धडे।



                                       -Jayjeet :-)

Ankita Patil

**सुंदर कविता ...शेवटच्या चार ओळी अगदी सुंदर**
A.Patil.

Jayjeet