तांडा

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2016, 04:16:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तांडा

काही क्षण, काही निमिष
न उलगडलेली कोडी
एकत्र करून चालत राहतात...
थांबत नाहीत कधी,
कुठल्या वळणावर, मुक्कामावर...
कसा तांडा आहे हा?
क्षणांचा? त्या निमिषांचा?
घडयाळाच्या काटया सोबत
जो चालत राहतो...
काही माझ्या, काही तूझ्या आणि
काही आपल्या...
भावनांशी खेळता खेळता
फिरत राहतो...
दिवस, महिने, वर्षे?
कुठवर?... माहित नाही
चालेल... कदाचित हा तांडा
सुर्याच्या अंता पर्यंत !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९