यंदा election हाय जोरात

Started by abhishek panchal, November 16, 2016, 10:53:09 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

काय झालंय आमचं , किती किती सांगू ?
हक्कासाठी आमच्या , कुठं कुठं भांडू ?
आयुष्याचा नुसता , खो खो होऊन बसलाय
खो घेणारा आमचा , स्वतः सुद्धा फसलाय

नेमके आताच माझे फासे , पडले सापाच्या त्या घरात
उगा लोक म्हणत होते , यंदा election हाय जोरात

पुरा हिशोबाचा बांध , आज खऱ्याअर्थी फुटलाय
एक चाल करून गेला , दादा show देत सुटलाय
आता धरण्याला बसू , कि बांध हा सावरू ?
होतं नव्हत्यावर सारं , असं पाणी कसं फेरु ?

काही कळायच्या आतच , ढकलून दिलंय मला पुरात
उगा लोक म्हणत होते , यंदा election हाय जोरात

आता भरल्या ताटाची , पुरी आस शमून गेली
खेटा घालून इथे तिथे , पुरी पिढी दमून गेली
तरी रस्ता नाही कोठे , चारी बाजूला ती दरी
आकड्याच्या आकडीने , दिली अद्दल ती खरी

हाती तिकीट घेऊन , बिन पैशाची हि वरात
उगा लोक म्हणत होते , यंदा election हाय जोरात

                                        - अभिषेक पांचळ
                                       ( ९०२८८७५९५८ )