नाते

Started by Asu@16, November 16, 2016, 11:03:42 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     नाते

नाते असावे मनाचे
नसावे केवळ तनाचे
नात्याचे बंधन नसावे
हृदयाचे स्पंदन असावे

नाते असावे प्रेमाचे
नसावे नुसते कामाचे
नात्याला अर्थ असावा
केवळ स्वार्थ नसावा

नाते असावे वास्तव
नसावे लोक लाजेस्तव
जगण्याची जान असावे
आयुष्याची शान असावे

नात्याचे ओझे होता
मनाने खुजे होतो
शरीराने जवळ असून
एकमेकां दुजे होतो

दुधावरची मलई तशी
आयुष्याची कमाई असते
नात्याविना जगणे रुसते
नात्यातच जगणे हसते

असते तेव्हा नाते छळते
नसते तेव्हा किंमत कळते
जगण्याचे सत्य हे
आयुष्याच्या अंती वळते.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita