तू जवळ असलीस की

Started by सनिल पांगे....sanilpange, November 18, 2016, 11:52:20 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

तू जवळ असलीस की
तुझ्या आठवणी नुसत्या आराम करतात
दूर असतेस, तेव्हां त्या
तू जवळ असण्याचे काम करतात


तू जवळ असलीस की,
तुझ्याच विचारात मी गुंतत जातो
तू हलका चावा घेतेस गालाचा
मी स्वप्नं वास्तवेत गुंफत जातो


तू जवळ असलीस की
मार्ग आपोआप सापडत जातो
माझा प्रवास गरूड होवून
आसमंती उडत जातो


तू जवळ असलीस की
दु:ख परक्यासारखी वागतात
हात जोडत सारी एकत्रित
माझ्याकडे विश्रांती मागतात


तू जवळ असलीस की
तुझ्या डोळ्यात स्व:तास बुडवत जातो
स्वप्नांची कितीतरी पतंगं त्या,
निळसर आकाशात उडवत जातो


तू जवळ असलीस की
चिऊ, मैनेचं गाणंही संगीत भासतं
मी एक कोरा कागद, तरी
काही क्षण जिवनाचं चित्र रंगीत भासतं


तू जवळ असलीस की
माझ्या मागे स्फूर्ती उभी रहाते
प्रत्येक कार्यात अवचित
माझी किर्ती नभी जाते


तूझी साथ असणं म्हणजे
एक दगड हृद्याचं पाघळणं
तूझी साथ असणं म्हणजे
फुलांनी काट्यांना कुरवाळणं
तूझी साथ असणं म्हणजे
जाणाऱ्या प्रत्येक क्षणांचं हिरवळणं
तूझी साथ असणं म्हणजे
जिवनात समाधानाचं विरगळणं
पण........................तुझा विरह
...........तुझा विरह जणू माझ्यासाठी
एका जिवघेण्या वेदनेचं चिघळणं
@ सनिल पांगे