काळ कुणासाठी न थांबला .........,

Started by Ashok_rokade24, November 20, 2016, 12:02:31 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

सुनसान रातीला आठवांच्या साथीला ,
शांत निद्राधीन सारे  जागा मी एकला ,

विचारांचे वादळ अंतरी दिशाहीन मी ,
लाभले जरी सारे दुबळा अन्  दीन मी ,
समृध्द त्यांसी केलै झीजविले मला मी ,
स्पर्शही मायेचा शुलापरी वाटू लागला ,

सुनसान रातीला आठवांच्या साथीला ,
शांत निद्राधीन सारे  जागा मी एकला ,

बदलली दुनियादारी नसे कुणाचा कुणी,
बाहेर सागर अफाट नसे डोहाचे पाणी ,
अवघड तरून जाणे साथीला हवे कुणी ,
सूर चिंतेचा आता त्यांना नकोसा झाला ,

सुनसान रातीला आठवांच्या साथीला ,
शांत निद्राधीन सारे  जागा मी एकला ,   

लाविता नांव माझे सन्मान बहू मिळाला ,
झोका सुखाचा  ऊंच आकाशी भिडला ,
वेदनांचा संसारातील विसर पडून गेला ,
कुंकवाचा कपाळी आकार सूक्ष्म  झाला ,

सुनसान रातीला आठवांच्या साथीला ,
शांत निद्राधीन सारे  जागा मी एकला ,

सुखाची शिडी मी ऊमजेल कधीतरी ,
दुखाचा वाटेकरी जाणवेल कधीतरी ,
नाही गवसणार कितीही शोधीलेतरी
काळ कधीही कुणासाठी नच थांबला ,
काळ कधीही कुणासाठी नच थांबला . !!!!!!!

सुनसान रातीला आठवांच्या साथीला ,
शांत निद्राधीन सारे  जागा मी एकला ,

                           अशोक मु. रोकडे.
                            मुंबई,