"ओळखलसं का मला"

Started by सनिल पांगे....sanilpange, November 20, 2016, 12:09:01 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

मी नाही विचारत
कधीच व कोणालाही
ओळखलस का मला?
आरशात मी पाहतो मला
तिथे मला भेटतं
एक अनोळखी प्रतिबिंब
अतिशय सुंदर, तेजस्वी, उत्साही
पण,
मी कधी सुंदर होतो वा तेजस्वी
आणि हो, उत्साही तर कधीच नव्हतो
मग मला माझेचं प्रतिबिंब अनोळखी भासते
आरसाही मला मुखवटाच वाटतो
मग नजर वळते तुझ्या नजरेकडे
माझं अस्तित्व, माझी ओळख शोधण्यासाठी
तिथे भेटतो
कोलमडलेल्या शपथांचा भंगार
वास्तवाच्या चितेवर
स्वप्नांचे पेटते अंगार
थकलेल्या आठवणींचे
ते हरलेले जुगार......
त्या शपथा, स्वप्ने, आठवणी
प्रत्येकजण मला आवर्जून विचारताना
का रे "ओळखलसं का मला"

@ सनिल पांगे