शिवार स्वप्न

Started by vishal maske, November 20, 2016, 08:22:02 PM

Previous topic - Next topic

vishal maske

----------( शिवार स्वप्न )----------

बीज पेरल्या मातीमधी
अंकुर लागलं फूटायला
हिरवा शालु नेसुन जणू
धरणी लागली नटायला

देऊन मायेचं खात आज
नजरेनं ठोंबांना गोंजारलं
खुशी-खुशीने डोले पीक
पाहून जीवाचं मन भरलं

मना-मनातील आशेमधलं
शिवार लागलं फूलायला
उदार मनातील हेरलेलं हे
सपान लागलं जुळायला

या स्वप्नाचे माणिक मोती
शेता-शेतात चमकतील
पाहूनी यांना नजरेचे झोत
मनाच्या मनात ठुमकतील

शिवार पाहून खुलु लागले
सारे धरणी आईचे लेकरं
नशिबातल्या दारिद्र्याची
म्हणे चुकेल आता ठोकरं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदरील कविता ऐकण्यासाठी आणि डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783