ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:19:55 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

आईबापाचे रूप,,,,,____

कोण देवा करता काशी गेला
कोण महम्मदाच्या काबा गेला,!
ज्यांना होती नजर त्यांनी देव
आईबापाच्या चरणी पाहिला,!

कोण पाचवेळचे नमाजी झाले
कोण जीवनभर पुजारी झाले,!
मिळाले त्यांनाच मनातले सर्व
जे आईबाप आज्ञाधारी झाले,!

कोणी गीताचे प्राणायाम केले
कोणी रोज कुरान पठन केले,!
ह्या जगी आनंदी तोच दिसला,
ज्याने आईबापाचे मनन केले,!

कोणी रमजानचे रोझा ठेवले
कोणी नवरात्रीचे उपास केले,!
पण सुखी तोच झाला कायम,
ज्याने आईबाप ह्दयात ठेवले,!

कोणी रामचा अवतार गायला
कोणी अल्लाह गुण गायला,!
पण दोन्ही त्यावर खूष झाले,,
जो आईबाप सेवा धुंद राहिला,!

✍🏻ललित कुमार______________
31/08/2016 [12;35am]
wapp7744881103