ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:24:20 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

साठ रूपयाचा बँनर लावून
भाऊ, दादा, नाना पैदा झाले
चौकाचौका बाप कमाईवर,,,
साले भुरटे भाई पैदा झाले,!

इथे ह्या पक्षाचा त्या पक्षाचा
गर्वान शाखा प्रमुख होतात,!
खादी खालच्या उंदरापुढे,,
कायम लुंगी डान्स करतात,!

जेव्हा कमवायचे वय तेव्हा
हे पक्ष प्रचार करत असतात,!
ही गरम जवानी सरली मग,,
गावगाव साल धरत असतात,!

पोरगा आमचे नाम कमावेल
आई बाप स्वप्नं पाहून मेले,!
बिडी सिगारेटच्या धूरासंगे,,,
पोरास रोज यम भेटून गेले,!

नव काही करण्याची उम्मेद
कुठे आजकाल दिसत नाही,!
मागेपुढे फिरणाऱ्यांचे खरंच
कुठेच भविष्य दिसत नाही,!

✍🏻ललित कुमार_________________
7/11/2016(8;03pm)
wapp7744881103
खूप दिवसांनंतर लिहितोय,,,
कुठे चुकलो तर मार्गदर्शन करावे,,,