ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:25:26 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

माणूस इथे माणसाच्या विरोधात चालला
अंधळ्या लालचेने लालचेचा गळा दाबला,
म्हणे,,, देश बदलत आहे,,,

शिकून संघटित व्हा महापुरूषांचा मुलमंत्र
आम्ही शिकलो संघटित झालो जातीसाठी,,
म्हणे,,, देश बदलत आहे,,,

ते मंदिर मस्जिद बांधायला पुढाकार घेतात
रस्त्यावर झोपतो त्यास पत्ता विचारच नाही,,
म्हणे,,, देश बदलत आहे,,,

रोज आईपासून बाप कायमचा वेगळा होतो
तो फुटभर दोर अपेक्षेचे नशीब ठरवून जातो,,
म्हणे,,, देश बदलत आहे,,,

ह्या देशाचा त्या देशाचा माल घेऊ नका सांगे
बरं नाही घेणार, तसाच माल देशी आहे का?
म्हणे,,, देश बदलत आहे,,,

✍🏻ललित कुमार_________________
30/10/2016 (2:01am)
wapp7744881103
[देश बदलेल पहिले जातीय धर्मीय मतलबी भ्रष्टाचारी लुटारू मानसिकता बदला ।,,]