ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:27:18 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

दिवाळी।,,,

मागच्या सालचा धुऊन सदरा
घातली चड्डी काळी,!
झोपड्या मधल्या मजूरांची
साजरी झाली दिवाळी,!

सवय मिरची संगे कच्चीपक्की
भाकर खायची,,
आज तळलेल्या भज्या खाऊन
साजरी झाली दिवाळी,!

भाऊबीजेला भाऊराया बहिण
लागली ओवाळू,,
हसऱ्या रडऱ्या भावूक मिठीनं
साजरी झाली दिवाळी,!

तो फटाके नजरे घेऊन गेला
कपड्या बाजारी,,
मायला बदलाया लुंगड्ये आणून
साजरी झाली दिवाळी,!

सालदारकीचा धंदा बारमाही
ढेकळांशी खेळणं,,
जिंदगीचे चार दिवस हसून
साजरी झाली दिवाळी,!

✍🏻ललित कुमार_______________
28/10/2016(1:26am)
wapp7744881103