ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:29:36 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

दुसऱ्याच्या वरातीत नाचू नाचू
आम्ही तर वाजवणारे थकवले,!
जवानीच्या सळसळत्या रक्ताला
आम्ही आमच्या हाताने नासवले,!

बाप आमचा कष्ट करू करू
काळ्या मातीत एकरूप झाला,!
त्याने कमावलेला तो पाई पाई
आम्ही नशा करण्यात उडवला,!

आई आमची बोलता बोलता
तिच काळीज काढून दावायची,!
तिने पाहिलेल्या त्या स्वप्नांना
आम्ही हसत काडी लावायची,!

मास्तर आम्हाला ओरडू ओरडू
भविष्याची कहाणी सांगत होता,!
त्याला आम्ही डोकेदुखी समजून,
कापूस बोळा कानी भरला होता!

आता ते दिवस, ती वेळ गेली
तोडांत मारायला कोणी नाही,!
या त्या मागे फिरण्यावाचून, ह्या
जीवणात दुसरा पर्याय नाही,!

ललित कुमार____________
wapp7744881103