ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:32:01 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

गुंठा-गुंठा जमीन विकून
आम्ही सोसायटी लढवली,!
एकमेकांच्या जिरवाजिरवीत
आम्ही आमचीच जिरवली,!

त्याच्या पोराचा लग्न मंडप
माझ्या दरवाजापर्यत आला,!
मी भी एकराच तुकड विकून
पोराच्या लग्नात धिंगाना केला,!

त्याने दोन चाकी घेतली तर
मी चार चाकी घ्यायच ठरवलं,!
बँकेत, घरादार गहाण ठेऊन
मी माझच घोड नाचवलं,!

गुंठा-गुंठा सारी जमीन गेली
घर सोडायची पाळी आली,!
जिरवाजिरवीच्या नादात मला
तोंड लपवायची पाळी आली,!

माझ्या नादात त्याची गेली
त्याच्या नादात माझी गेली,!
घरदार जमीन गाडी इज्जत
बँकेवाल्यांनी उतरवून नेली,!

✍🏻ललित कुमार_____________

माझी जुनी रचणा,,,,,.........
आवडाली तर जरूर नावासह शेयर करा,,,,,,,.....
----------------------------------
wapp7744881103