ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:34:17 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कुठे चूकत आहे आपण?,,

हो नावाला आम्ही शिव फुले
शाहू आबेंडकर जपत असतो
वरून दिसतो सफेद आम्ही,
पण आतून काळेच असतो,!

महासत्ता झाला असता देश
विचार महात्माचे चालून पण,
विचारावर चालते कोण इथे,
जो तो महात्मे वाटत असतो,!

इथे त्यांचा पुतळा हवा, ह्या
रस्त्याला त्यांचे नाव द्यावे,
काळजात न ठेवता, त्याच्या
निर्जीव मूर्त्या बांधत असतो,!

आंदोलन करतो नाव घेऊन
इथे आम्ही मोर्चे ही काढतो,
जाती व्यवस्था मोडणाऱ्यांना
आम्ही जातीत ओढत असतो,!

म्हणून हा ललित कधी कधी
स्वतःला दोष देऊन म्हणतो
हा देश बदलला असता पण
त्यास आम्ही रोकत असतो,!

✍🏻ललित कुमार_______________
wapp7744881103