ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:35:39 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

श्रध्देतील अंधश्रध्देला हाकलून लावायला,!
बदलत्या काळी जातीस मुठमाती द्यायला,,
मी एक मोर्चा काढणार आहे,,,
याल ना तुम्ही,?,,,

असा काही धर्म स्थापू जिथे भूकेला महत्त्व,
चला आहे त्या धर्मांना धर्मशास्त्र शिकवाया,
मी एक मोर्चा काढणार आहे,,,
याल ना तुम्ही,?,,,

आईपासून बाप वेगळा झाला त्याच दोरामुळं
त्या दोराला आता भरचौकात फाशी द्यायला,
मी एक मोर्चा काढणार आहे,,,
याल ना तुम्ही,?,,,

ती आई, बहिन, मैत्रीण पहिले ती स्त्री असते,
पण जुनाट विचारी ती तिस त्यातुंन काढाया,
मी एक मोर्चा काढणार आहे,,,
याल ना तुम्ही,?,,,

हो ते बांडगूळ आल होत घरी भिक मागाया,
जसं गेल तसं परत ते दिसलेच नाही म्हणून,
मी एक मोर्चा काढणार आहे,,,
याल ना तुम्ही,?,,,

✍🏻ललित कुमार_______________
26/07/2016 (5;21am)
_wapp7744881103 ________
सहज प्रवासात सुचलेले शब्द,,।,
सुचनेचे स्वागत,,।