ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:38:09 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईथे आपसी लढाई
तो हिंदू,  तो मुस्लिम,  तो शिख, तो ईसाइ,,,
""यांच्यातला माणूस मेलाय,,,,,,,

किड लागली  मातीला  गर्व करता जातीचा
मी महार, मी मांग,  मी ब्राम्हण,  मी मराठा,,,
""अरे भानावर येणार कधी?,,,,,,,

इच्छा तिरंगा आकाशी  हवा पण हाती मात्र
कुठे लाल,कुठे हिरवा,कुठे निळा,कुठे भगवा,,
""अरे भावांनो रंगांना तरी सोडा,,,,,,

जातधर्म काही कमी होते जे भाषाही धरली
मी मराठी मी गुजराती मी हिन्दी मी बंगाली,,
"" अजून किती खाली उतरणार ,,,,,,,

सर्व काही वाटून झाले निदान महात्मा सोडा
माझे बाबा माझे गांधी माझे फुले माझे राजे,,
""अरे जनावरांनो माणसे बना,,,,,

✍🏻ललित कुमार__________________
wapp7744881103
29/08/2016 [2:27am]___________