ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:41:36 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कारण,, माझा भारत देश महान,,,,,

काळा पैसा मिळकतीला कोळसा खान
चारा खाऊन गब्बर झाला बिहारी वान,!
कारण,, माझा भारत देश महान,,,,,

दारूगोळे तोफा अन् ते उडणारे वाहण
घोटाळ्यांच्या राजाचा होतो पद सन्मान,!
कारण,, माझा भारत देश महान,,,,,

जनावर खाद्ये अन् कापले राखीव रान
माणूस नाही इथे किंमती कागदाचे पान,!
कारण,, माझा भारत देश महान,,,,,

ज्याने त्याने छाटले इथल्या भिंतींचे कान
स्वीज बँकेच्या खात्यांना नवी दिली जान,!
कारण,, माझा भारत देश महान,,,,,

लोकशाही मैदानाचे नाही कोणाला भान
बनावटी पदव्यांनी वाढली नेत्यांची शान,!
कारण,, माझा भारत देश महान,,,,,

✍🏻ललित कुमार ____________
16/09/2016 (1;55am)
wapp7744881103